शिरूर तालुक्यात PMRDA अधिकाऱ्यांचे समर्पण — नागरिकांच्या सेवेसाठी रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज
17 आक्टोंबर २०२५ शिरूर पुणे प्रतिनिधी (एन.एच.जायभाये)
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (pmrda) अंतर्गत कार्यरत PMRDAचे महानगर आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक महानगर नियोजनकार श्री कार्तिक शिंदे, लेखाधिकारी श्री विनय बोलके आणि सहमहानगर नियोजनकार श्री श्रीकांत प्रभुणे आणि त्यांचे वरिष्ट अधिकारी आणि त्यांचे सहायक यांनी शिरूर तालुक्यातील नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या अधिकाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत म्हणजेच रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून काम करण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे.
नागरिकांच्या विविध अर्ज, विकास आराखडे, नकाशे मंजुरी तसेच नियोजनाशी संबंधित कामांवर हे अधिकारी स्वतः लक्ष देत आहेत.त्यामुळे शिरूर तालुक्यातील लोकांची कामे जलद गतीने पूर्ण होत असून, नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि तत्पर सेवा मिळत आहे.
स्थानिक नागरिकांनी PMRDA अधिकाऱ्यांच्या या कामाच्या पद्धतीचे मनापासून कौतुक केले असून, अशा प्रामाणिक व सेवाभावी अधिकाऱ्यांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

