पळसखेड तालुका लोणार येथील भाविक भक्तांना कीर्तनासाठी मिळाली शेवटी इंदोरीकर महाराजाची तारीख ..
पळसखेड तालुका लोणार येथे सालाभराप्रमाणे श्री संत भगवान बाबा यांचा सप्ताह जानेवारी महिन्यात मोठ्या आनंदाने साजरा केल्या जात आहे. परंतु पळसखेड येथील भावीक भक्तांना जेष्ठ प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कीर्तनाची तारीख मिळत नव्हती. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही शेवटी पळसखेड येथील श्री जितु थोरवे, माउली जायभाये (उपसरपंच पळसखेड) गजानन राधाकिसन सोनुने, प्रमोद कैलास थोरवे, प्रगतीशील शेतकरी गजानन उत्तमराव जायभाये आणि पंढरी दत्तात्रय कायंदे यांनी महाराजाची त्यांच्या राहत्या घरी इंदोरी येथे भेट घेऊन दिनांक २० जानेवारी २०२५ ला वेळ सायंकाळी ९ ते ११ या वेळेत महाराजांचे जाहीर कीर्तन होणार आहे अशी तारीख महाराजांनी दिली आहे.आणि सदर कीर्तन सेवेचे सौजन्य श्री पंढरी दत्तात्रय कायंदे यांचे आहे. तसेच गावकरी मंडळी पळसखेड आणि श्री संत भगवान बाबा मित्र मंडळ पळसखेड यांनी श्री कीर्तन सेवेचे मानकरी श्री पंढरी कायंदे यांचे आभार व्यक्त केले आहे.तसेच लोणार तालुक्यातील व आसपासच्या गावातील भाविकांना कीर्तनाचा आनंद घ्यावा अशी भगवान बाबा मित्र मंडळ पळसखेड यांनी भाविकांना आवाहन केले आहे.